साधनपेटी |
नागनाग हा विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे. नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करुन समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखील विविध खूणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते. नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणी व पक्षी[१] आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकर्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रू माणूस आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये मुंगुस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो. [२] . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.
[संपादन] नागाच्या उपजातीभारतीय नाग (Naja naja naja)नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे वावर सर्वत्र असतो. काळा नाग (Naja naja karachiensis) ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तान व राजस्थान मध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो. शून्य आकडी नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्यचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागा सारख्याच आहेत. थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवास्थान आहे. नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेउन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे. नागराज हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार हा साप लांबीला पाच ते साडेपाच मी लांबीला असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. विषारी असला तरी घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येइपर्यंत अंड्याचे रक्षण करतो. [संपादन] नागाचे विषदरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात त्यामुळे नागाचे विष हा काय प्रकार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुतांशी नाग चावला आहे या भीतीनेच माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वता:हून आक्रमण करत नाहित केलाच तर हा नाग आपले संरक्षणाहेतू करतो. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काहि वेळा कोरडा दंश देखील होउ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural systemकाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काहि वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्या माणसाला विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास असमर्थ होतात. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव १/२ तासात ते दीड दिवसापर्यंत जाउ शकतो. [संपादन] प्रतिविषनाग चावल्यानंतर सर्वात पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार )प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखील नागाच्याच विषापासून बनवलेले असते [३]. [संपादन] भारतीय संस्कृतीमध्येभारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दूधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. सांगली जिल्ह्यामधील ३२ शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो[४]. हजारो नाग या दिवसाकरीता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
[संपादन] गैरसमजनागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग मानव मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालिलप्रमाणे[६]
[संपादन] चित्रपटातत्याचप्रमाणे अनेक हिंदी चित्रपटांनी नाग व सापांबद्द्ल गैरसमज वाढवण्यास मदत केली आहे. सर्वात प्रसिद्ध चित्रपट १९८६ मधील श्रीदेवी, अमरीश पुरी व ऋषीकपूर चा नागिन आहे ज्यामध्ये श्रीदेवी ही नाग तसेच मानवी रुप धारण करु शकत असते. तसेच जॅकी श्रॉफ चा दूध का कर्ज इत्यादी चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहेत. [संपादन] संदर्भ
|